जळगावधार्मिकसामाजिक

जळगाव जळगाव शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

शांततेसाठी विशेष प्रार्थना

जळगाव जळगाव शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी
जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

शांततेसाठी विशेष प्रार्थना

जळगाव प्रतिनिधी सर्वत्र शांतता नांदो तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. सोमवारी शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुत्वाचा संदेश देण्यात आला.

ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे अजिंठा चौफुली नजीकच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी सर्व मानव जातीचे कल्याण होऊ दे, शेती आणि पिण्यासाठी पुरेसा पाऊस पडू दे, तसेच संपूर्ण विश्वात शांती लाभू दे, अशा मंगल कामनांसह प्रार्थना करण्यात आली.

ईदनिमित्त शहरातील विविध मान्यवरांनी ईदगाह मैदानात उपस्थित राहून मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या. तसेच पुष्पगुच्छ देऊन सौहार्दाचा संदेश दिला. ईद निमित्ताने शहरभर आनंदाचे वातावरण होते.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button