गुन्हेजळगाव

चोपड्यात कट्ट्यासह तरुण गजाआड! 

चोपड्यात कट्ट्यासह तरुण गजाआड! 

चोपडा – शहरातील नगरपालिका पाठीमागील कन्नस्थाना परिसरात एक तरुण गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संशयितास अटक केली. ही घटना बुधवार, २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता घडली.

मी

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कन्नस्थाना परिसरात सापळा रचून संशयित तरुणास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला अंदाजे ४०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला.

पोलिस तपासात या तरुणाची ओळख कार्तिक रविंद्र पवार (वय २१, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव) अशी पटली. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह कलम १३५ अंतर्गत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, तसेच पोलीस कर्मचारी जितेंद्र सोनवणे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, हर्षल पाटील, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, प्रकाश मधुरे आणि प्रमोद पवार यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button