जळगाव

बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्ग अनुभव’ व वन्यप्राणी प्रगणना उपक्रम यावल वनविभागात उत्साहात

बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्ग अनुभव’ व वन्यप्राणी प्रगणना उपक्रम यावल वनविभागात उत्साहात

२७ हून अधिक वन्यजीव प्रजातींची नोंद; बिबट्यासह ४९२ वन्यजीव व पक्ष्यांचे थरारक निरीक्षण

जळगाव मीडिया न्यूज डेस्क l बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने यावल प्रादेशिक वनविभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रज्वलित पौर्णिमेच्या प्रकाशात जंगलात संपूर्ण रात्र थांबून १५० हून अधिक निसर्गप्रेमींनी प्राणी निरीक्षणाचा थरार अनुभवला.

वन्यजीव प्रगणनेसाठी यावल वनविभागाने ३९ मचाणांचे नियोजन केले होते. उपक्रमात बिबट्या, अस्वल, कोल्हा, लांडगा, ससा, भेकर, निलगाय, रानडुक्कर, चिंकारा, चौशिंगा, काळवीट, साळिंदर अशा अनेक दुर्मीळ व स्थानिक प्रजातींचे थेट दर्शन झाले. यावर्षी एकूण ४९२ वन्यजीव व पक्ष्यांची नोंद झाली असून २७ हून अधिक प्रजाती निदर्शनास आल्या.

विशेष म्हणजे रावेर वनक्षेत्रात बिबट्याचे थेट दर्शन, तर वैजापूर वनक्षेत्रात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या. हवामान ढगाळ असूनही उपक्रम यशस्वीपणे पार पडला. नोंदणीसाठी ऑनलाईन QR कोड प्रणालीचा वापर करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, तहसीलदार बंडू कापसे, मानद वन्यजीव रक्षक रविंद्र फालक, अभ्यासक अमन गुजर यांच्यासह विविध संस्था, प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.

उपक्रमाचे यशस्वी आयोजन धुळे वनवृत्ताच्या वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे व समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांनी केले.

“पावसाच्या शक्यतेने काही अडथळे येण्याची भीती होती, मात्र हवामानातील अचानक बदलामुळे प्राण्यांच्या हालचाली व वर्तनाचे निरीक्षण नव्या पद्धतीने करता आले,” असे समाधान पाटील यांनी सांगितले. निसर्गप्रेमींना ही एक संस्मरणीय अनुभवयात्रा ठरली.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button