गुन्हेजळगाव

राहत्या घरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या: रामेश्वर कॉलनीतील घटना

राहत्या घरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या: रामेश्वर कॉलनीतील घटना

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका ४० वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ५ जुलै) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश केशव राखुंडे (वय ४०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे कुटुंबासह वास्तव्यास होते. शनिवारी त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. त्यांनी तातडीने योगेश राखुंडे यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार करीत आहेत.

टीप : आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा मार्ग नाही. मानसिक तणाव किंवा अडचणींचा सामना करत असाल तर कुटुंबीय, मित्र किंवा तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button