गुन्हेजळगाव

टायर फुटताच मजुरांची पिकअप उलटली; २० शेतमजूर जखमी

टायर फुटताच मजुरांची पिकअप उलटली; २० शेतमजूर जखमी

यावल-फैजपूर मार्गावरील सांगवी-हिंगोणा दरम्यान भीषण अपघात; काही जखमींना जळगावला हलविले

यावल प्रतिनिधी : यावल-फैजपूर मार्गावरील सांगवी ते हिंगोणा दरम्यान सोमवारी सकाळी शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने वाहन उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे २० शेतमजूर जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

शेतीच्या कामासाठी निघाले होते मजूर

चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील शेतमजूर पिकअप वाहनातून (एमएच ४३ बीबी १२६४) यावल तालुक्यातील न्हावी येथे शेतीच्या कामासाठी जात होते. सांगवी-हिंगोणा रस्त्यावर आल्यानंतर वाहनाचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका चालक धावले मदतीला

अपघाताची माहिती मिळताच भीम आर्मीचे सागर मेघे, पंकज डामरे, बबलू गजरे आणि सचिन पारधी तसेच रुग्णवाहिका चालक मनोज भोयटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयात उपचार

यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. प्रज्ज्वल मंत्री, अधिपरिचारिका माधुरी ठोके, नीलिमा गपणे, चंटकला कोल्टे तसेच आरोग्य सेवक कादर तडवी आणि अमोल अडकमोल यांनी जखमींवर उपचार केले.

जखमींची नावे

या अपघातात जगन पावरा, मंगला पावरा, अनिता पावरा, शहनाज तडवी, सुनीता पावरा, आसिफ तडवी, विराज पावरा, गिरा पावरा, राधा पावरा, नजुद्दीन तडवी, बाली पावरा, शीतल पावरा, भुरी पावरा, मीना पावरा, मेहंदीबाई पावरा, महिमा पावरा, बिरुलाल पावरा आणि खेमा पावरा (सर्व रा. कुंड्यापाणी, ता. चोपडा) यांच्यासह अन्य मजूर जखमी झाले आहेत.

“अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.”

— डॉ. तुषार सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, यावल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button