गुन्हेजळगाव

धरणाच्या पाण्यात बुडून शिरसोली येथील तरुणाचा मृत्यू

धरणाच्या पाण्यात बुडून शिरसोली येथील तरुणाचा मृत्यू

जळगाव : धरणाच्या पाण्यात बुडून भूषण रवींद्र

खलसे (वय २५, रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २४ ऑगस्ट रोजी शिरसोली नजीक घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील भूषण खलसे या तरुणाचा गावाजवळील धरणाच्या

पाण्यात बुडाला. ग्रामस्थांना तरुण पाण्यात बुडल्याचे आढळल्याने त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ अनिल तायडे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button