
जळगाव मीडिया प्रतिनिधी: भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांची सुरुवात आज, २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगाव जिल्हा रुग्णालयात फळ वाटपाने करण्यात आली. रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात फळांचे वाटप करण्यात आले.
यासोबतच शहरातील उस्मानिया पार्क येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात जहांगीर अहमद खान, इरफान कैसर शेख, अब्दुल हमीद शेख, अफसर हमीद शेख, वसीम शेख,अर्शद पठाण, जावेद खान, अफसर शेख, सलमान सईद खान, जुबेर अहमद साहब,कासिफ आरिफ शेख,राजु भाऊ मराठे, संजय भाऊ शिंदे, राजू शेख, रेड प्लसब्लड बँक चे डॉक्टर नर्सेस, कर्मचाऱ्याच्या सहकार्य लाभले, तसेच पिंप्राळा हुडको परिसरातही रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यात नगरसेवक सुरेश भाऊ सोनवणे, मंडळ अध्यक्ष अतुल भाऊ बारी, नगरसेवक जाकीर भाईपठाण, किरण भाऊ भोई, मोहम्मदनुर शेख. साबीर पठाण. वसीम शेख. असलम शेख. तौसीफ शेख
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमांना राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी महापौर दीपमाला काळे, उपाध्यक्ष दीपक परदेशी, नगरसेविका उज्वला ताई बेंडाळे नगर सेवक टिक्की बालाजी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परवेज पठाण, उपाध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा किंवा कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता रुग्णांना फळ वाटप आणि रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी संदेश देण्यात आला.
दरम्यान, जळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.



