राजकारण

शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास! भुसावळच्या राजकारणात नवे समीकरण; अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत

जळगाव मीडिया भुसावळ | प्रतिनिधी — भुसावळच्या राजकारणात गुरुवारी मोठी राजकीय घडामोड घडली असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांना यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील नंदवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासोबतच आगामी काळात नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती देणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या राजकीय निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पक्षप्रवेशाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते मा. गुलाबरावजी पाटील, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सौ. सरिता माळी कोल्हे आणि जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

अनिलभाऊ चौधरी आणि नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळमध्ये पक्षाची राजकीय ताकद वाढणार का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा नेमका परिणाम काय होणार? याकडे आता जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणातील पुढील डावपेचांना वेग येण्याची शक्यता असून, येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button