खंडेराव नगरातील पाण्याच्या टाकीला गळती; तातडीने दुरुस्तीची मागणी
नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाहणी; संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी

खंडेराव नगरातील पाण्याच्या टाकीला गळती; तातडीने दुरुस्तीची मागणी
नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाहणी; संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी
जळगाव, प्रतिनिधी : शहरातील खंडेराव नगर परिसरातील पाण्याच्या टाकीला गळती सुरू झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पाण्याच्या संभाव्य अपव्ययाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्येची प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक जाकीर पठाण, सुरेश सोनवणे, माधुरी अतुल बारी, कविता किरण भोई तसेच सामाजिक कार्यकर्ते अतुलभाऊ बारी आणि किरण भोई यांनी पाहणी केली.
पाण्याच्या टाकीला लागलेली गळती तातडीने थांबविणे आवश्यक असून, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जळगाव महानगरपालिका प्रशासनाने या समस्येची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. टाकीची आवश्यक दुरुस्ती करून गळती बंद करावी, जेणेकरून पुढील धोका टाळता येईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेशी संबंधित अशा समस्यांकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.



