जळगावराजकारणसामाजिक

भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी

भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी

खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे व जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण

जळगाव : आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि महान क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती रविवार, १५ नोव्हेंबर रोजी भाजप कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सकाळी १० वाजता भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा) आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी केलेले कार्य आणि त्यांचे क्रांतिकारी योगदान यांचे स्मरण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, एस.टी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक कोळी, संतोष इंगळे, उदयजी भालेराव, दीपक परदेशी, पितांबर भावसार, महेश चौधरी, नगरसेविका वैशालीताई पाटील, सागर पाटील, प्रमोद वाणी, चेतन शर्मा, खंबायत तसेच एस.टी. मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button