जळगावशैक्षणिकसामाजिक

डॉ करीम सालार यांचा ‘ जीवन गौरव स्मृति ‘ सन्मानाने गौरव

डॉ करीम सालार यांचा ‘ जीवन गौरव स्मृति ‘ सन्मानाने गौरव

जळगाव प्रतिनिधी I इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ करीम सालार यांनी इकरा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून खानदेशातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक, सामाजिक ,साहित्यिक, सांस्कृतिक प्रगती करिता तसेच राजकारणातील नगरपालिकेतील नगरसेवक ते महापौर म्हणून केलेल्या जळगावकरांच्या समाजसेवेबद्दल विवेक ठाकरे यांच्या ग्राम गौरव मीडिया हाऊसच्या तृतीय वर्धापनानिमित्त ‘ ज्ञान कर्मी सन्मान व विशेषांक मुखपृष्ठ प्रकाशन ‘ समारंभात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या शुभहस्ते ‘ जीवन गौरव स्मृति ‘ सन्मानाने त्यांना गौरवान्वित करण्यात आले.

कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर ,पत्रकार सुरेश उज्जैनवाल आदि अतिथी म्हणून उपस्थित होते .आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुण भाई गुजराथी म्हटले कि खानदेशातील इकरा तसेच अन्य भाषिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे राष्ट्र निर्माणचे महत्वपूर्ण कार्य संपन्न होत आहे. हे या संस्थाचालक व पदाधिकाऱ्यांच्या ईमानदारी, प्रखर राष्ट्रीय भावना,दूरदृष्टी, अथक मेहनत , यशस्वी नेतृत्वामुळे संपन्न होत आहे. अशा सेवा भावी नेतृत्वाच्या कार्याला मीच नव्हे तर देश सलाम करतो.

सत्काराला उत्तर देताना डॉ करीम सालार म्हटले कि अभिनेता दिलीप कुमार यांच्या शोच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम समाजाच्या आर्थिक पाठिंब्या मुळे माझ्या व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून इकराचे रोप 1980 मध्ये लावण्यात आले. आता ह्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.अनेक विद्यार्थी देश विदेशात विद्यालयातील , महाविद्यालयातुन मिळवलेल्या ज्ञान, कौशल्यांच्या बळावर रोजगारातून समाजसेवा करीत आहे. जळगाव मध्ये 1970 मध्ये उद्भवलेल्या मोठ्या धार्मिक दंगली नंतर इकरा तसेच इतर समाजातील शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द , सलोखा, सहिष्णुता तसेच राष्ट्रीय एकात्मता भक्कम होण्यास हातभार लागलेला आहे. कार्यक्रमात खानदेशातील इतर संस्था चालकांचा ही सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button