गुन्हेजळगावसामाजिक

घरफोडी करून ३० हजारांची रोकड लंपास

घरफोडी करून ३० हजारांची रोकड लंपास
धानवड येथे मध्यरात्रीची घटना; लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरट्याने साधला डाव
जळगाव : तालुक्यातील धानवड येथे अज्ञात चोरट्याने घरात शिरून लोखंडी पेटीचे कुलूप तोडत ३० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानवड येथील गोकुळ नवल चव्हाण (वय १९) हे आपल्या कुटुंबासह राहतात. २ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटा त्यांच्या घरात शिरला. घरातील मागील खोलीत ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यामधील ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. चोरीनंतर चोरटा घटनास्थळावरून पसार झाला.
सकाळी उठल्यानंतर घरातील पेटी फोडलेली व रोकड गायब असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ३ जून रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button