जळगावसामाजिक

रिफॉर्मेशन कपचा शानदार समारोप, रंगरेज शॉपी संघाने मारली बाजी

ऑनलाइन जुवा हटाओ देश का युवा बचाओ” विषयावर प्रबोधन

जळगाव l प्रतिनिधी I मुस्लीम समाजातील युवकांना एकत्र करीत त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला वाव देण्याच्या हेतूने प्रेरित रिफॉर्मेशन कपच्या तिसऱ्या पर्वाचा शनिवारी समारोप करण्यात आला. अंतीम सामन्यात Mr. कॅप्टन विरुद्ध रंगरेज शॉपी संघाने विजय मिळवत विजयी चषकावर आपले नाव कोरले. अतिशय शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. सोबतच यावर्षी रिफॉर्मेशन तर्फे फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बुद्धिबळची सुद्धा स्पर्धा घेण्यात आली.

मुस्लीम समाजातील १० युवकांनी एकत्र येत गेल्या दोन वर्षा पूर्वी युवकांना जोडण्यासाठी आणि समाज प्रबोधनाच्या हेतूने रिफॉर्मेशन कप या क्रिकेट सामन्याची संकल्पना मांडली होती. आयपीएल प्रमाणे खेळाडूंचा लिलाव आणि संघ प्रायोजकत्व अशी पद्धत असलेल्या स्पर्धेत दरवर्षी एक नवीन संकल्प ठेवत त्यावर प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या दोन वर्षा पूर्वी नशामुक्त समाज या विषयावर तर गेल्या वर्षी आत्महत्यामुक्त समाज आणि यंदा “ऑनलाइन जुवा हटाओ देश का युवा बचाओ” या विषयावर प्रबोधन करण्यात आले.

शहरात शिवतीर्थ मैदानावर क्रीडा सामन्यांना सुरुवात झाली होती. स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले तर प्रत्येक संघाचे ३ सामने झाले. उत्कृष्ट प्रकाश यंत्रणा, खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी, आवाज आणि समालोचक, लाईव्ह स्ट्रिमिंग अशा विविध सुविधा स्पर्धेठिकाणी देण्यात आले.

तीन दिवस स्पर्धेचा अंतीम सामना Mr. कॅप्टन विरुद्ध रंगरेज शॉपी या संघात खेळवण्यात आला असता रंगरेज शॉपी संघाने विजय मिळवला. रंगरेज शॉपी संघात शोएब खान, जुलकरनैन कुरेशी, जुलफेकार कुरेशी, अश्फाक खान, मुजफ्फर शेख, रेहान खान, रेहान शेख, मोहम्मद तहा, आकिब जावेद, करीम शेख, शोएब बागवान, फैसल शेख, जबी जागीरदार होते.
सर्व विजेते संघ आणि स्पर्धकांना अब्दुल करीम सालार, मुफ्ती हारून, इब्राहिम पटेल, फारुख शेख, मोहम्मद फारुख, हारून पटेल, आरिफ देशमुख, शकिल रंगरेज, डॉ. रागीब जागीरदार, जमील देशपांडे, डॉ. रिजवान खाटीक, जमील शेख, वसिम बापू, यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीतील रेहान खाटीक, शारीक शेख, आसिफ देशमुख, जकी अहमद, आमिर शेख, आमिर पटेल, शोएब बागवान, अलफैज पटेल, अजहर खान, अब्दुल रेहमान यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे समालोचन अलफैज पटेल, अयाज मोहसीन यांनी केले. तसेच सूत्र संचालन अयाज मोहसीन तर आभार रेहान खाटीक यांनी मानले. पंच म्हणून हमीद अन्सारी, फयाज अन्सारी, नुरुल हुदा अन्सारी, मजीद अन्सारी, साद शेख यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button