गुन्हेजळगाव

आकाश भावसार खून प्रकरणात पाचव्या संशयीताला अटक

आकाश भावसार खून प्रकरणात पाचव्या संशयीताला अटक

जळगाव – कालंका माता चौक परिसरात घडलेल्या आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर) या तरुणाच्या निर्घृण खूनप्रकरणी पोलिसांनी पाचव्या संशयितास अटक केली आहे. सोमवारी (५ मे) कुणाल उर्फ चौधरी (वय २३, रा. कासमवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणातील चार संशयितांना यापूर्वी रविवारी अटक करण्यात आली होती. त्यात अजय मंगेश मोरे (वय २८) आणि चेतन रवींद्र सोनार (वय २३, दोघेही रा. कासमवाडी) यांना १३ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

आकाश भावसार याच्यावर कालंका माता चौक परिसरात हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत चार संशयितांना रविवारी अटक केली आणि आता पाचव्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button