
माजी आमदार दिलीप वाघ यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
मुंबई वृत्तसंस्था पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज मुंबई येथे आपल्या असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे भाजपला एक स्थानिक मोठा नेता मिळाल्यामुळे जिल्ह्यात भाजपचे आणखी ताकद वाढणार आहे.
माजी आमदार दिलीप वाघ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आदींच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
आजच्या प्रवेश सोहळ्यात दिलीप वाघ यांच्यासह त्यांचे बंधू तथा पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, वाघ कुटुंबिय आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.