जळगावराजकारण

प्रभाग ६ मध्ये धीरज सोनवणेंचा झंझावात;हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

प्रभाग ६ मध्ये धीरज सोनवणेंचा झंझावात;हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

घराघरात जाऊन मतदारांशी साधला थेट संवाद

जळगाव (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक ६ मध्ये आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. माजी नगरसेवक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खंबीर नेतृत्व धीरज मुरलीधर सोनवणे यांनी आज आपल्या प्रचाराचा झंझावाती शुभारंभ केला. प्रभाग ६ ‘क’ मधून निवडणूक रिंगणात असलेले सोनवणे यांनी पहिल्याच दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रचारात कोणतीही कसर न सोडता, धीरज सोनवणे यांनी गणेश नगर येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आणि श्रीफळ वाढवून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे किशोर देशमुख यांच्यासह पॅनलमधील इतर उमेदवार आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास” हा मंत्र घेऊन सोनवणे यांनी प्रभागातील घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला. अनेक ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी बोलताना धीरज सोनवणे म्हणाले की, प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हीच आपली प्राथमिकता आहे. हनुमान मंदिरातून फुंकलेल्या या रणशिंगाला जनशक्तीचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. मशाल चिन्हासह धीरज सोनवणे मैदानात उतरल्याने प्रभाग ६ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, त्यांच्या या झंझावातामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button