गुन्हेजळगावसामाजिक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार

​कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांचे पाऊल; प्रांताधिकाऱ्यांकडून हद्दपारीचे आदेश जारी

जळगाव मीडिया प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. सोमवारी (दि. ७) एकाच दिवशी १४ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले.

​या कारवाईत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ६, जामनेर येथील ३, एमआयडीसीतील २ तसेच रामानंदनगर, जिल्हापेठ व फत्तेपूर येथील प्रत्येकी एका इसमाचा समावेश आहे. यातील अरमान चिंधा पटेल, अक्रम शहा सादीक शहा, हरी पांडुरंग पाटील, विपुल गोविंदा नाथ, आवेश खान उर्फ काल्या शेख जहांगिर, मुक्तार शेखा खलील शहा, आताल्लाह शाह अमानल्लाह शाह आणि चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशीर या आठ जणांना एका वर्षासाठी,

तर जगन्नाथ रामकृष्ण कोळी, प्रकाश सुभाष शिंदे आणि सोपान अशोक इंगळे या तिघांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शांतता बिघडवणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर असणार असून आवश्यकता भासल्यास पुढील काळातही अशाच स्वरूपाची ठोस कारवाई केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button