जळगावसामाजिक

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; येलो अलर्ट जारी !

प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; येलो अलर्ट जारी !

प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन

जळगाव मीडिया न्यूज डेस्क l  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, यामुळे तापमानात घट झाली आहे. यामुळे नागरिकांना उष्म्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान विभागाने आगामी दोन दिवसांसाठी (१० आणि ११ मे) पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केळी, कांदा, मका, ज्वारी यांसारख्या पिकांचे सुमारे १२,००० हेक्टर क्षेत्रावरील उत्पादनाला फटका बसला. एप्रिलमध्ये तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते आणि मे महिन्यात उष्णतेची लाट येण्याची भीती होती. मात्र, अवकाळी पावसाने तापमान कमी केले.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button