गुन्हेजळगाव

चिंचोलीत उसनवारीच्या पैशांवरून आठ जणांची एकाला बेदम  मारहाण

चिंचोलीत उसनवारीच्या पैशांवरून आठ जणांची एकाला बेदम  मारहाण

जळगाव (प्रतिनिधी) – उसनवारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून तालुक्यातील चिंचोली येथे आठ जणांनी संगनमत करून एका व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवलसिंग रतनसिंग पारधी (वय ५२, रा. चिंचोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २२) दुपारी इच्छापूर देवी (ता. बुर्‍हाणपूर, मध्य प्रदेश) येथील फुलसिंग काळू चव्हाण, निर्मलाबाई फुलसिंग चव्हाण, विक्की पुंडलिक चव्हाण, रोहन पुंडलिक चव्हाण, पुंडलिक फुलसिंग चव्हाण तसेच वराडसिम (ता. भुसावळ) येथील विलास उत्तम धारराव, सागर काशीनाथ चव्हाण आणि चिंचोली येथील करण विजय पारधी यांनी संगनमत करून त्यांच्याशी वाद घातला.

उसन दिलेल्या पैशांच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्यानंतर सर्व आरोपींनी नवलसिंग यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी संबंधित आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button