गुन्हेजळगावसामाजिक

पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप वाघ यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पाचोरा प्रतिनिधी l आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

दिलीप वाघ यांच्या रूपाने भाजपला पाचोरा भडगाव तालुक्यात एक भक्कम चेहरा मिळाला असून पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद यामुळे वाढणार असल्याचे बोललेले जात आहे.

काही दिवसांपासून दिलीप वाघ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज मुंबईत झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात अधिकृत प्रवेश केला.

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार मंगेश चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते.या सोहळ्यात दिलीप वाघ यांच्यासह त्यांचे बंधू आणि पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, वाघ कुटुंबीय आणि त्यांचे अनेक समर्थक यांनी भाजपात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button