गुन्हेजळगाव

जिल्हा पोलीस दलाला मिळणार 16 नवीन अत्याधुनिक वाहने

जिल्हा पोलीस दलाला मिळणार 16 नवीन अत्याधुनिक वाहने

२ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर

जळगाव l प्रतिनिधी राज्य शासनाकडून सुमारे दोन कोटी बारा लाख रुपयांचा निधी जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आला असून या निधीतून १५ महिंद्रा स्कॉर्पिओ आणि १ महिंद्रा ७०० या वाहनाचा समावेश असून, यासाठी राज्य शासनाकडून सुमारे २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या नव्या गाड्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस दलाचे कामकाजामध्ये प्रभावी कार्य आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, गस्त वाढवणे, तसेच आपत्कालीन प्रसंगी वेगाने प्रतिसाद देणे अशा बाबतीत या गाड्या मोलाची भूमिका बजावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्हा पोलिस डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या वाहनांची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. आता शासनाच्या मान्यतेनंतर लवकरच या गाड्या पोलिस दलाच्या सेवेत दाखल होतील. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जीपीएस सिस्टम, वायरलेस सेटअप आदी सुविधा असणार आहेत. गावागावांतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही मोठी पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button