राजकारण

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना समर्थन देण्याकरिता सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो

जळगाव मीडिया (प्रतिनिधी) – पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचारासाठी प्रख्यात सिने अभिनेते गोविंदा आहुजा यांच्या रॅलीचे भव्य रोड शोचे आयोजन आज शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पांच वाजता करण्यात आले आहे.

एरंडोल – पारोळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात महायुतीचे कार्यकर्ते अमोल पाटील यांचा प्रचार करत आहे. तसेच अमोल पाटील हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. अमोल पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते गोविंदा हे एरंडोल शहरात आज शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पांच वाजता येत आहे.
सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे हा रोड शो महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, अमळनेर दरवाजा, श्री विठ्ठल मंदिर पांडव वाडा, श्रीराम मंदिर,भोई गल्ली, जे डी सी सी बँक, राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बुधवार दरवाजा, चुनाभट्टी, रंगारी खिडकी पूल, श्री दत्त मंदिर, जय हिंद चौक, मेन रोड, व जोहरी गल्लीतील गुरुद्वारावर या रोड शोच्या समारोप होणार आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button