
जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क : मेहरूण येथे दिवंगतांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी एजाज मलिक यांची उपस्थिती होती.
या आरोग्य शिबिरात ४५० नागरिकांना आकाश चेकअप करण्यात आले, तर १८० जणांची मोतीबिंदू साठी तपासणी करण्यात आली. तसेच ३२० नागरिकांची मेडिकल चेकअप करण्यात आली. शिबिरात आयोजित रक्तदान उपक्रमात २६ जणांनी रक्तदान केले. याशिवाय २० मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि एका पायाच्या शस्त्रक्रियेची नोंद करण्यात आली.
दिवंगतांच्या स्मृती जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरातून अनेक गरजू नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.
आयोजन फरहान रुस्तम शेख, साबिर भाई, जमीन प्रधान, आसिफ सर, शकील सर



