गुन्हेजळगाव

जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम; बेकायदेशीर मद्यपान आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

​१५३ हॉटेल-लॉजची तपासणी; कोटपा कायद्यानुसार ७१ जणांवर गुन्हे दाखल, लाखो रुपयांचा दंड वसूल

​जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २२ जून रोजी संध्याकाळपासून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मद्यपी, अवैध व्यावसायिक आणि टवाळखोरांना लक्ष्य करण्यात आले.

​या तपासणी मोहिमेत मोकळ्या मैदानावर मद्यपान करणारे ४१ जण, वाईन शॉपबाहेर दारू पिणारे ५ जण आणि खाद्य स्टॉलवर दारू पिणारे २ जण अशा एकूण ४८ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत ६४१ वाहनधारकांकडून ५ लाख १६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

​महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विशेष गस्त घालण्यात आली. यावेळी कर्णकर्कश हॉर्न वाजवणारे १६ वाहनधारक आणि सार्वजनिक शांतता भंग करणारे ४४ जण पोलिसांच्या रडारवर आले. तसेच शाळा परिसरातील ७१ पानटपऱ्यांवर सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर ‘कोटपा’ कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील १५३ हॉटेल, ढाबे, लॉज आणि अल्पवयीन मुलांची गर्दी असणाऱ्या १९ कॅफेंची देखील पोलिसांनी कसून तपासणी केली.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button