अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरणगाव येथे शासकीय योजना जनजागृती शिबिराचे आयोजन

अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरणगाव येथे शासकीय योजना जनजागृती शिबिराचे आयोजन
वरणगाव (ता. भुसावळ), जळगाव येथील सामाजिक संस्था अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरणगाव येथील अक्सा नगर परिसरात शासकीय योजनांविषयी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच आरोग्य विषयक योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यासोबतच शिबिरात उपस्थित डॉक्टर समीर आणि डॉक्टर विश्वजीत यांनी बांधकाम मजुरांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरात सुमारे ५५ प्रकारच्या मोफत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
शिबिरादरम्यान बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी, नोंदणी नूतनीकरण तसेच कामगार कार्ड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच महिलांसाठी आवश्यक असलेल्या एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रियाही करण्यात आली. या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युसुफ शाह यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून नागरिकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेकदा माहितीअभावी या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जनजागृती करून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ट्रस्टतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात वरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक अशपाक शाह, नगरसेविका प्रतिनिधी इरफान सय्यद (मिर्जा), अमन सोसायटीचे अध्यक्ष अमोनोदिन शेख सलाउदिन, सचिव झहीर खान, जाकीर शाह, सामाजिक कार्यकर्ते इम्रान भाई शाह, मौलाना शाफिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युसुफ शाह, जाकीर शाह, खालिद साबीर शाह, रेहान फारूक शाह, मुजाहिद कुरेशी, उजेर शेख, जुनेद अहमद तसेच अमन बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



