
भाजप विश्वकर्मा सेलच्या संघटन विस्तारावर भर
जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जळगावात बैठक; आगामी उपक्रमांचे नियोजन
जळगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या विश्वकर्मा सेल, जळगाव महानगर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक भाजपचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत संघटन बळकटीकरणासह विविध सामाजिक उपक्रम आणि आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
संघटन बळकटीकरणावर चर्चा
बैठकीत विश्वकर्मा सेलच्या संघटन विस्तारावर, नवीन सदस्य नोंदणी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीस विश्वकर्मा सेलचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, महेश वर्मा, संजय जगताप, संजय दीक्षित, संजय पगार, विजय शेवाळे, संदीप डोलारे, धीरज वर्मा, विनोद दंडगव्हाळ, प्रमोद रूले यांच्यासह विश्वकर्मा समाजातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजहितासाठी उपक्रमांचा संकल्प
बैठकीच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. तसेच विश्वकर्मा सेलच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला.




