
जळगाव मीडिया दि. २२ ऑक्टोबर : कृषी विभागाची विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी दुष्काळ पंचनाम्यांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि त्याबाबत आवश्यक कार्यवाही या विषयांवर विशेष चर्चा करण्यात आली.
बैठकीत दुष्काळ पंचनाम्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. पंचनाम्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच पीक विमा योजनेची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रलंबित प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला.
(AgriStack) अंतर्गत शेतकरी नोंदणी व फार्मर आयडी निर्मितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शेतकरी नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्यावर भर देण्यात आला. तसेच आत्मा (ATMA) योजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सुरू असलेली कामे, योजनांची प्रगती आणि लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबतही आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, दुष्काळ पंचनाम्यांसह प्रलंबित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करणे तसेच शेतकऱ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक सचिन दोहरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



