मॅगी खाऊन कुटुंब झोपलं, दुसऱ्या दिवशी सगळेच मृत, एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, दिल्ली हादरली

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली परिसरातील ग्रेटर नोएडा भागात एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या तीन लहान मुलांसह पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महेश (वय ३६) यांचे कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून झोपले होते. या कुटुंबाने रात्री साधारण १० वाजता ‘मॅगी’ खाल्ली होती आणि त्यानंतर ते सर्वजण झोपायला गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी बऱ्याच उशिरापर्यंत या कुटुंबातील कोणाचेही हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना शंका आली
त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, पाचही जण आपापल्या बेडवर मृतावस्थेत आढळले. महेश (वय ३६ – पती), ललिता / ललतेश (वय ३४ – पत्नी),लड्डू (वय १२ – मुलगा), मिस्टी (वय ८ – मुलगी), साक्षी (वय ४-सर्वात लहान मुलगी) असे कुटुंबातील मृतांची नावे आहेत.




