गुन्हे
कुंड्यापाणी येथे शेतकऱ्यांवर अस्वलाचा हल्ला; दोन जण गंभीर जखमी, जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

कुंड्यापाणी येथे शेतकऱ्यांवर अस्वलाचा हल्ला; दोन जण गंभीर जखमी, जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
जळगाव: चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी शिवारात शेतात काम करत असताना दोन शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. रानडुकरांच्या त्रासाने आधीच हैराण असलेल्या या भागातील शेतकऱ्यांमध्ये आता अस्वलाच्या हल्ल्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी शेतकऱ्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, वन विभागाने पुढील ४८ तासांच्या आत या घटनेचा पंचनामा करून संबंधित जखमींची तक्रार नोंदवून घ्यावी, अशी मागणी केली आहे.




