जळगावराज्य

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड;

६५ व्या वर्षीही क्रीडा क्षेत्रात सक्रिय

जळगाव मीडिया न्यूज़ नेटवर्क : हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांची हॉकी महाराष्ट्राच्या सन २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या कार्यकारिणीत कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली आहे. पुणे येथील हॉटेल ऑर्किडमध्ये २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी आयएएस अंजली कुमार मिश्रा यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

हॉकी महाराष्ट्राच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी आयपीएस कृष्णप्रकाश, तर सचिवपदी मनोज बोरा यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी रमेश पिल्ले, मनीषा आकारे आणि गुरमीत सिंह, कोषाध्यक्षपदी कैलास सोनार, तर उपसचिवपदी पूनम दुर्गे आणि महेश कुथाडे निर्वाचित झाले. कार्यकारी संचालक म्हणून फारुक शेख यांच्यासह डॉ. केजल भारसाखरे आणि रुपेश चव्हाण यांची निवड झाली. तसेच हेलन मेरी, विक्रम पिल्ले, आकाश चिकटे आणि वैशाली सुळ यांची खेळाडू प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

६५ वर्षांच्या वयातही फारुक शेख क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत. हॉकीसोबतच ते फुटबॉल, बुद्धिबळ, जलतरण, व्हॉलीबॉल तसेच पॅरालिम्पिक क्रीडा क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल विविध क्रीडा व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी फारुक शेख यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीकडे जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button