नशामुक्त समाजासाठी तरुणाईची प्रभावी हाक!
DRUG FREE DISTRICT–2026’ अंतर्गत Reel Competition सहभागींचा विशेष सन्मान

जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क | प्रतिनिधी नशामुक्त समाज निर्मितीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘DRUG FREE DISTRICT–2026’ अभियानांतर्गत आयोजित Reel Competition मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या स्पर्धकांचा विशेष सन्मान सोहळा गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा सन्मान सोहळा लोणारी समाज मंगल कार्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. Reel Competition मध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून नशामुक्त समाजाचा संदेश प्रभावीपणे मांडला. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि Reelच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचा संदेश मोठ्या प्रमाणात पोहोचू शकतो. याच माध्यमाचा सकारात्मक वापर करत सहभागी स्पर्धकांनी ‘Say No to Drugs’ तसेच नशामुक्त समाजाचा संदेश तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
‘तुमची Reel केवळ एक व्हिडिओ नसून, नशामुक्त समाजासाठी उठविलेली सकारात्मक आवाज आहे,’ या भावनेतून या उपक्रमाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून युवापिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे, सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. वंदना उमेदवार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नशामुक्त युवा • स्वस्थ समाज • सशक्त भारत या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाला Reel Competition मधील सर्व सहभागींची उपस्थिती अपेक्षित आहे.
कार्यक्रम: DRUG FREE DISTRICT–2026 – Reel Competition सहभागींचा सन्मान सोहळा
दिनांक: ८ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ११ ते दुपारी १
स्थळ: लोणारी समाज मंगल कार्यालय
आयोजक: आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन


