आरोग्यजळगावसामाजिक

मेहरूणमध्ये दिवंगतांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ

४५० नागरिकांची नेत्रतपासणी, १८० जणांची मोतीबिंदूसाठी तपासणी; २६ जणांचे रक्तदान

मेहरूणमध्ये दिवंगतांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ

४५० नागरिकांची नेत्रतपासणी, १८० जणांची मोतीबिंदूसाठी तपासणी; २६ जणांचे रक्तदान

जळगाव, प्रतिनिधी : दिवंगतांच्या स्मृती जपत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मेहरूण येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. नेत्रतपासणी, सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, रक्तदान तसेच मोतीबिंदूशी संबंधित तपासणी व शस्त्रक्रियांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत करण्यात आली.

या शिबिरात ४५० नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली, तर १८० जणांची मोतीबिंदूसाठी तपासणी करण्यात आली. तसेच ३२० नागरिकांची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदान उपक्रमात २६ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. याशिवाय शिबिरांतर्गत २० मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि एका पायाच्या शस्त्रक्रियेची नोंद करण्यात आली.

दिवंगतांच्या स्मृतींना समाजोपयोगी उपक्रमांची जोड देत गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे, तसेच समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या शिबिरामागील उद्देश होता. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला.

या आरोग्य शिबिराच्या आयोजनात फरहान रुस्तम शेख, साबिरभाई, जमीन प्रधान आणि आसिफभाई यांच्यासह आयोजकांनी योगदान दिले. दिवंगतांच्या स्मरणार्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button