
विषारी दंश आणि रेल्वेच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. असोदा येथील महिलेचा विषारी कीटकाच्या दंशामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बोरनार ते डोमगावदरम्यान धावत्या रेल्वेची धडक लागल्याने दुसऱ्या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
विषारी दंशाने महिलेचा मृत्यू
जळगाव : विषारी कीटकाच्या दंशामुळे लक्ष्मीबाई सुरेश कोळी (वय ५५, रा. असोदा, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २३ ऑगस्ट रोजी कीटकाने दंश केल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २४ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील करीत आहेत.
रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू
धावत्या रेल्वेची धडक लागल्याने मंगल श्यामराव कोळी (वय ५०, रा. बोरनार, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. २४ ऑक्टोबर रोजी बोरनार ते डोमगावदरम्यान ही घटना घडली. रेल्वेची धडक लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.



