गुन्हेजळगावराज्यशासकीयसामाजिक

दिवाळीत एसटीची चाके थांबण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

२६ मागण्यांसाठी ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून आंदोलन; प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

दिवाळीत एसटीची चाके थांबण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

२६ मागण्यांसाठी ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून आंदोलन; प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

जळगाव : दिवाळीच्या तोंडावरच राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाची बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना वाहतुकीच्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो.

२६ मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा पवित्रा

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व सवलती लागू कराव्यात, एसटी महामंडळासाठी अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद करावी, तसेच सुधारित दराने ६० टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

याशिवाय महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीपूर्वी अदा करावी, ऑक्टोबर महिन्याचे वेतन ५ नोव्हेंबरपूर्वी द्यावे, कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी आणि अमानवी कामाचे तास बंद करावेत, यांसह एकूण २६ मागण्यांचा समावेश आहे.

दिवाळीत प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता

दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी एसटीची बससेवा बंद झाल्यास नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे संपाचा इशारा लक्षात घेता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button