गुन्हेजळगाव

सुनील महाजन यांना छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

सुनील महाजन यांना छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी  महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांच्यावर शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र दाखल गुन्ह्यानंतर ते फरार होते. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) खंडपीठाकडून सुनील महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामिनाला मंजुरी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव महापालिका मालकीची जुनी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने २ डिसेंबर २०२४ रोजी काढली जात होती. या पाईप चोरीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासात सुनील महाजन आणि रोहन चौधरी यांची नावे वाढवली होती. या प्रकरणात सूत्रधार सुनील महाजन हे असल्याचे समोर आले होते. यानंतर आणखी २ वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्ह्यात सर्व प्रकरणाचा सूत्रधार म्हणून आरोप असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन हे अजूनही फरार आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. सुनील महाजन मिळून येत नसल्याने त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरू केली होती. तर महाजन यांनी मुंबई उच्चन्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडपीठाच्या न्या.पेडणेकर यांच्या न्यायालयाने सुनील सुपडू महाजन यांना ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील कामकाज दि.४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाजन यांच्यातर्फे अँड.सागर चित्रे आणि अँड.राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button