गुन्हेजळगावसामाजिक

खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अवघ्या काही तासांत गजाआड !

खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अवघ्या काही तासांत गजाआड !

LCB पथकाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी): एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या कासमवाडी येथे ३ रोजी मध्यरात्री झालेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य संशयिताला LCB च्या (स्थागुशा) पथकाने अवघ्या काही तासांतच शिताफीने अटक करण्यात यश आले आहे.

खुनाच्या गुन्ह्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तात्काळ सूचना दिल्या. त्यानुसार गायकवाड यांनी पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोर्क. छगन तायडे, पोकों. रविंद्र कापडणे यांसहित पथक तयार करून संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.

स्थागुशा पथकाने खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे नशिराबाद परिसरात सापळा रचला. या सापळ्यातून खुनातील मुख्य आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला शिताफीने पकडण्यात आले. आरोपीला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

 

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button