
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि स्व. चंद्रकांत मेंढकी यांना भाजपकडून अभिवादन
जळगाव : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तसेच जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची भक्कम पायाभरणी करून पक्षाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देणारे ज्येष्ठ नेते स्व. चंद्रकांत (मेंढकी) काका यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रवाद, एकात्मता आणि अखंड भारताच्या संकल्पनेसाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तसेच जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक उभारणीत स्व. चंद्रकांत मेंढकी यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरचे जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महापौर दिपमाला काळे, गटनेते प्रकाश बालाणी, माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी व नितीन इंगळे, ज्येष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव, रेखा वर्मा, दिपक परदेशी, अशोक राठी, भूषण लाडवंजारी, ललित बडगुजर, सागर पाटील, दीप्ती चिरमाडे, नगरसेवक निलेश तायडे (निलू आबा), जितेंद्र चव्हाण, सैनिक आघाडी संयोजक राजेंद्र मराठे, राजश्री सोनवणे, शिरीष तायडे, दिलीप लाडवंजारी, युवा मोर्चा सरचिटणीस रोहित सोनवणे, हर्षल सिखवाल, अमित देशापांडे, अशोक कोष्टी, दिपक कोळी, तुषार सूर्यवंशी, डॉ. नितीन पाटील, सरोज पाठक, प्रशांत सावंत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, समाजाभिमुख आणि संघटनात्मक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.


