गुन्हेजळगाव

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

अडावद पोलिसांची कारवाई; एकास घेतले ताब्यात

जळगाव : अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवझिरी गावाजवळील शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कारवाई करून गांजाची १७५ झाडे जप्त केली असून, देवसिंह बरेला याला ताब्यात घेतले आहे.
८ सप्टेंबर रोजी डीवायएसपी सुनील पाटील व अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित शेतशिवारात पाहणी करण्यात आली.

यावेळी गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी एकूण १७५ झाडे जप्त केली. जप्त मुद्देमालाचे वजन व बाजारमूल्य निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

देवझिरी गावाचा परिसर मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, गांजाची लागवड कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button