गुन्हेजळगाव

दुचाकी चोरटा जेरबंद ; पाच दुचाकी जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगांव -छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका चोरट्याला अजिंठा चौफुली येथे चोरीची दुचाकी विक्री करताना एमआयडीसी पोलिसांनी 22 रोजी अटक केली असून त्याच्याकडून पाच चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना 22 रोजी एक संशयित दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर अजिंठा चौफुली येथे सापळा रचून दीपक प्रेमसिंग सोळंके रा वरठाण ता .सोयगाव जी. छत्रपती संभाजी नगर याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळुन आली. त्यावरुन दिपक सोळंके यास विचारपुस केली असता त्याने  जळगाव शहरातुन ३, छत्रपती संभाजीनगर येथुन १, व अडावद येथुन १ अशा एकुण ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यादवचा क्या त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या.

ही कारवाई  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, पोना योगेश बारी, पोका राहुल रगडे, विशाल कोळी, फिरोज तडवी यांनी  आहे. संशयित आरोपीला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button