गुन्हे

हृदयद्रावक! आजीला चहा करायला सांगितला अन् २० वर्षीय तरुणाने वरच्या मजल्यावर जाऊन संपवले जीवन

हृदयद्रावक! आजीला चहा करायला सांगितला अन् २० वर्षीय तरुणाने वरच्या मजल्यावर जाऊन संपवले जीवन

​यावल शहरातील घटना; किनगाव बुद्रुक येथील तरुणाच्या आत्महत्येने खळबळ

​यावल: तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या एका २० वर्षीय तरुणाने यावल शहरातील आपल्या काकाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शेख जयैद शेख अख्तर (वय २०) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या या टोकाच्या पाऊलामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शेख जयैद हा शुक्रवारी यावल शहरातील आठवडे बाजार भागातील सईद पुरा येथे राहणारे त्याचे काका शेख हारुण शेख रशीद यांच्या घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने आपल्या आजीला चहा तयार करण्यास सांगितले आणि तो घराच्या वरच्या मजल्यावर निघून गेला. बराच वेळ झाला तरी जयैद चहा पिण्यासाठी खाली न आल्याने आजी त्याला बोलावण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. त्यावेळी जयैदने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खाली उतरवून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button