गुन्हेजळगाव

कोयत्याचा धाक दाखवून पाणीपुरीवाल्याकडून रोकड हिसकावून केली चौघांनी बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी:- कोयत्याचा धाक दाखवून आधी दोन हजार रुपयांची रोकड लुटून पाणीपुरीवाल्याला चौघांनी बेदम बदलल्याची घटना खोटे नगर स्टॉप जवळ चार रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

खोटे नगर परिसरात गौतम हकीमचंद यादव हा तरुण पाणीपुरीचा खोटे नगर स्टॉप जवळ व्यवसाय करतो. चार रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरी विक्री करण्यासाठी उभा असताना संशयित

गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील सर्व रा. जळगाव हे बुलेट वरून आल्यानंतर या चौघांपैकी दादू कोळी याने लोखंडी कोयता काढून गौतम यादव याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडून जबरदस्तीने दोन हजार रुपये हिसकावले. मात्र एवढ्यावर न थांबता या चौकडीने लाकडी दांडक्याने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी गौतम यादव याने त्या ठिकाणावरून पळ काढला असताना चौघांनी त्याचा कोयता घेऊन पाठलाग करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .

याप्रकरणी गौतमने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्या वरून संशयित आरोपी गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील सर्व रा. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button