गुन्हेजळगावशैक्षणिकसामाजिक

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २२ शिक्षकांच्या मुलाखती

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २२ शिक्षकांच्या मुलाखती

५ सप्टेंबरला शिक्षक दिनी पुरस्कार वितरण; प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड होणार

जळगाव | प्रतिनिधी : जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या २२ प्रस्तावांमधील शिक्षकांच्या मुलाखती बुधवारी साने गुरुजी सभागृहात घेण्यात आल्या. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून, शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चाळीसगाव व मुक्ताईनगर तालुक्यातून प्रत्येकी तीन, अमळनेर व बोदवड तालुक्यातून प्रत्येकी दोन, तर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतून प्रत्येकी एक प्रस्ताव प्राप्त झाला होता. या सर्व २२ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

मुलाखतीतील गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड करून एकूण १५ शिक्षकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहेत.

या मुलाखती प्रक्रियेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, प्रभारी समाजकल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शबाना शहा, उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण आदी उपस्थित होते.

मानपत्र, शाल-श्रीफळ आणि ५०० रुपयांचे पारितोषिक

निवड झालेल्या आदर्श शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ५०० रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button