
जळगाव मीडिया प्रतिनिधी: केंद्र सरकारकडून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक उपयुक्त योजना राबवल्या जात आहेत. अशाच एक महत्त्वपूर्ण योजनेचं नाव पंतप्रधान स्वनिधी योजना आहे. या योजनेचा उद्देश गरीब व लघु व्यवसायिकांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
Aadhar Card Loan 2025 – मुख्य वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत तुम्हाला सुरुवातीस ५०,००० रुपये इतकं कर्ज मिळू शकतं. जर तुम्ही दिलेली रक्कम एका वर्षात परत केली, तर या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नाही. वेळेत कर्ज परतफेड केल्यास पुढील टप्प्यात दुप्पट रक्कम कर्जरूपात मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीची आवश्यकता नाही.
कोण पात्र आहे?
लघु व्यापारी, फेरीवाले, छोट्या व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नागरिक अल्पभूधारक शेतकरी आणि निम्न उत्पन्न गटातील लोक
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे बेरोजगार
कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया
1) जवळच्या सरकारी बँकेत भेट देऊन अर्ज सादर करा.
2) अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत:
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खात्याची माहिती (बचत खाते)
उत्पन्नाचा पुरावा (जर उपलब्ध असेल)
3) संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल.
4) पात्र ठरल्यास, तुमच्या खात्यात थेट कर्जरक्कम जमा केली जाईल.
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
सरकारने यासाठी अधिकृत वेबसाइट देखील उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकता.
https://www.pmsvanidhi.mohua.gov.in