गुन्हेजळगाव

जळगावच्या वकिलाला ७.६० लाखांचा गंडा

जळगावच्या वकिलाला ७.६० लाखांचा गंडा

रशियन कंपनीच्या नावाने गुंतवणुकीचा बनाव; पुण्यातील दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी

रशियन कंपनीचे शेअर्स, युरो-डॉलर ट्रेडिंग आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून जळगावातील ५७ वर्षीय वकिलाची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील विनोद निमानाथ सोनार आणि आनंद परदेशी यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विसांजी नगरातील ॲड. विजय बाबुलाल दाणेज यांच्या तक्रारीनुसार, ६ जून २०१६ ते २८ मार्च २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपींनी रशियन कंपनीशी संबंधित असल्याचे भासवणारे करारनामे, संचालकांची कागदपत्रे आणि वृत्तपत्रांतील बातम्यांचा आधार घेत दाणेज यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर बिटकॉईन खरेदी व गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांच्याकडून ७ लाख १० हजार रुपये घेण्यात आले. सुरुवातीला ३७२ डॉलर कमिशन देण्यात आले. खात्यावर नफा जमा होत असल्याचे दाखवण्यात आले; मात्र प्रत्यक्ष पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर अडचणी निर्माण झाल्या.

आपली रक्कम परत मागितल्यानंतर आरोपींकडून ‘एन्काऊंटर’ करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button