गुन्हेजळगाव

ड्रग्स प्रकरण : एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे निलंबित

ड्रग्स प्रकरण : एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे निलंबित

ड्रग्स स्पेडलरशी संपर्क असल्याने कारवाई; भुसावळ डीवायएसपीकडे चौकशीची जबाबदारी

जळगाव | प्रतिनिधी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यावर ड्रग्स पेडलरशी कथित संपर्क आल्याच्या पार्श्वभूमीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा निर्णय घेतला असून, या प्रकरणाची चौकशी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अलीकडेच एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अबरार कुरेशीविरोधात कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांचे त्याच्याशी कथित संबंध असल्याचे उघडकीस आले. विशेषतः उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र झाली.

याबाबत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत पोटे यांच्याविरोधात थेट संबंधाचे स्पष्ट पुरावे सापडले नसले, तरी एका पोलीस अधिकाऱ्याने संशयित व्यक्तींशी निकटता ठेवल्याचे गंभीर मानत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत एलसीबी विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनामुळे विभागाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. यापूर्वीही दोन कर्मचाऱ्यांना गुटखा विक्रेत्यासोबत संबंध आल्याने निलंबित करण्यात आले होते. आता पोटे यांच्यावर कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली असून, आणखी काही कर्मचाऱ्यांविरोधात चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निलंबन काळात पोटे यांच्यावर भुसावळ विभागातील डीवायएसपीमार्फत चौकशी करण्यात येणार असून, अहवालानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button