सिटी कॉलनीतील गाई चोरी प्रकरणी वकील विरुद्ध गुन्हा दाखल?

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील सिटी कॉलनी, अकबर मस्जिद समोर राहणारे सलीम घासी खान (वय 32) यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या तीन गाई ११ मार्च रोजी बेपत्ता झाल्या होत्या. अखेर २१ मार्च रोजी त्यांचा शोध लागताच प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.
गाई सापडल्या पण…!
सलीम घासी खान आणि त्यांचे पुतणे समीर खान व समशेर खान हे शिवाजीनगर डाळ फळ परिसरात असलेल्या अॅड. केदार भुसारी यांच्या गोठ्याजवळ गेले असता त्यांना त्यांच्या हरवलेल्या गाई तेथेच उभ्या दिसल्या! मालकाने आवाज दिल्यावर गाईने प्रतिसाद दिल्याने त्यांची ओळख पटली. सलीम खान यांनी त्वरित व्हिडीओ शूट करून हा पुरावा जमा केला आणि शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर एफआयआर क्रमांक 116/25, बीएनएस कायदा 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आता गाई पुन्हा गायब!
सलीम घासी खान यांनी २२ मार्च रोजी जळगाव पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की गाईंचा शोध लागल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह ते परत भुसारी यांच्या गोठ्यात गेले, मात्र तिथे गाई गायब होत्या!
नव्याने तक्रार; भुसारी दाम्पत्यावर संशय
या नव्या ट्विस्टमुळे अॅड. केदार भुसारी, त्यांची पत्नी अंजली भुसारी आणि इतरांवर संशय बळावला आहे. यामुळे फिर्यादीने पोलिस अधीक्षकांकडे नवीन तक्रार देऊन भुसारी दाम्पत्याचे नाव तक्रारीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिवाजी शिखरे करीत आहेत. गाई चोरी प्रकरणाचा सत्यत तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.