गुन्हेजळगाव

डांभुर्णी येथे गावठी दारू  करणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा 

105 लिटर गावठी दारू जप्त

डांभुर्णी येथे गावठी दारू  करणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हा 

105 लिटर गावठी दारू जप्त

यावल | प्रतिनिधी

तालुक्यातील डांभुर्णी गावात गावठी दारू विक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध यावल पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १०५ लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. या कारवाईत चौघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डांभुर्णी येथील बसस्थानक परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सहाय्यक फौजदार वसंत बेलदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकात हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, योगेश खोंडे, सचिन पाटील व हितेश बागुल यांचा समावेश होता.

कारवाईदरम्यान गणेश बळीराम बोरसे याच्याकडून २५ लिटर, बाळू गोपाळ सोनवणे याच्याकडून ३० लिटर, नितीन सुरेश कोळी याच्याकडून ३० लिटर आणि प्रल्हाद रूपा भिल याच्याकडून ३० लिटर गावठी दारू अशी एकूण १०५ लिटर दारू जप्त करण्यात आली.

या प्रकरणी चौघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button