जळगाव

भारतीय तंत्रविज्ञान संस्था (IIHT) बरगड / वेंकटगिरी येथे २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

भारतीय तंत्रविज्ञान संस्था (IIHT) बरगड / वेंकटगिरी येथे २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अर्ज सादरीकरणास १० जूनपर्यंत मुदत

जळगाव, केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगड (ओडिशा) येथील १३+१ जागांसाठी (तसेच वेंकटगिरीसाठी २ जागा काउंसिलिंगद्वारे भरल्या जाणार आहेत) पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. १० जून २०२५ पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय — नागपूर, सोलापूर, मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर — येथे सादर करावेत.
प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर संबंधित माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.dirtexmah.gov.in उपलब्ध आहे. तसेच, अर्जाचे नमुने सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयातही उपलब्ध आहेत. अशी माहिती संजय देने, भा.प्र.से., आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button