जळगावराष्ट्रीयशासकीय

विकसित भारत रोजगार योजना’: देशभरातील लाभार्थ्यांना २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान

विकसित भारत रोजगार योजना’: देशभरातील लाभार्थ्यांना २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान

​जळगावात खासदार स्मिता वाघ व आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

​जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. या राष्ट्रीय उपक्रमाचे थेट प्रक्षेपण जळगाव येथील गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात दाखवण्यात आले. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनीही दिल्लीतून या कार्यक्रमाला हजेरी लावली.

​पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितले की, आतापर्यंत २० लाख युवकांनी पहिल्या नोकरीतील सहा महिन्यांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. जळगाव येथील कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. खासदार स्मिता वाघ यांनी योजनेमागील पंतप्रधानांचा दूरदृष्टीकोन मांडला, तर आमदार राजूमामा भोळे यांनीही युवकांना शुभेच्छा दिल्या. जैन इरिगेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या १० सहकाऱ्यांसह अनेक लाभार्थ्यांना यावेळी अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button