राजकारण

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव मीडिया : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात असून, मुस्लिम समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले जावे, असे आवाहन भाजप अल्पसंख्यांक जळगाव उपजिल्हाध्यक्ष वसीम खान यांनी केले आहे.

जळगाव शहरातील युवकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ना. गिरीश भाऊ महाजन, आ. सुरेश दामू भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष प्रवेज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगण्यात आले.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button